रत्नागिरी:- ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही कोकणात, प.महाराष्ट्रात, मुबईत, मराठवाड्यात, विदर्भात कोण, किती राहतात याची जनगणना होणार नाही, तोपर्यंत विकासाची योजनाही राबवता येणार नसल्याचे हाके यांनी सांगितले. ओबीसींचे पंचायत राज मधलं आरक्षण गेलेले आहे. गावगाड्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, नगर परिषदां, शहरांत आपण आहोत. पण इथल्या सरकारला ओबीसी आरक्षण नको आहे, असे प्रतिपादन मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले.
ओबीसी संघर्ष समिती रत्नागिरीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा शनिवारी साजरा करण्यात आला. मारुती मंदीर सर्कल मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहीते, उपाध्यक्ष राजीव कीर, दिपक राउत, सचीव सुधीर वासावे, बावाशेठ साळवी, रघुवीर शेलार, रुपेंद्र शिवलकर, सौ. साक्षी रावणंग, सौ. शरयु गोताड आदी मान्यवर उपस्थित होते.
या जयंती सोहळ्यानिमित्त राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा ‘ओबीसींचे संविधानिक अधिकार’ हा मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यकम मारुतीमंदिर सर्पल बाहेर पार पडला. त्यावेळी हाके यांनी ओबीसींच्या न्याय, हक्क, अधिकारांबाबत सडेतोडपणे उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना बांधण्याचे, त्यांना न्याय देण्याचे महान कार्य केले. पण आज ज्या कायद्याच्या सभागृहात तुमच्या-आमच्या हिताचा कायदा बनतो, आरक्षण दिले जाते, प्रतिनिधीत्व, शिक्षणाचे विकासाचे धोरण हजारों कोटींचे बजेट ठरतं, त्या देशाच्या संसदेत राज्याच्या विधानसभेत पतिनिधीत्व जात नाही. ही मोठी गेम, राजकीय डाव आहे. ज्या महाराष्ट्राने या देशाला शिव, फुले, शाहू, आंबेडकर दिले. त्या पुरोगामी महाराष्ट्रात ओबीसी बांधव, भटक्या विमुक्तमधील माणसे जातीपातीत विभागली गेलीत. पत्येक जातीची संघटना वेगळी आहे. गावगाड्यातील बारा बलुतेदार तुम्ही-आम्ही जातीपातीत विखुरले गेलोय. ओबीसी आहोत,बहुजन आहोत. किती दिवस जातींचं संघटन घेउन पुढे जाणार आहोत. त्यासाठी ही जातीपातीची लढाई लढून चालणार नाही. तर ओबीसींच्या हक्कांसाठी जाती-जातींची युती करावी लागेल, त्यांना एकत्र बांधावे लागेल. त्यामुळे ओबीसींची चळवळ महत्वाची असल्याचे मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी सूचित केल.
या कार्यकमपसंगी सौ. दया चवंडे, सौ. स्नेहा चव्हाण, सौ. तनया शिवलकर, अमृता मायनाक, गजानन धनावडे, सलील डाफळे, गौरव नाखरेकर, गजानन मयेकर, मंगेश साळवी, बाबा नागवेकर, प्रविण रुमडे, नितीन तळेकर, कौस्तुभ नागवेकर, दिपक सुर्वे, शांताराम खापरे, जयसिंग राउत, अनंत भडकमकर, मनोहर ढवळे, सुरेंद्र घुडे, दिलीप भाटकर, नितीन जाधव, प्रकाश चव्हाण, गणेश भारती, सौ प्राजक्ता रुमडे आदी ओबीसी बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.