रत्नागिरी:- रत्नागिरीतील आंबेशेत येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एल व्ही सी संघ विजेता तर आरोही स्पोर्ट्स आंबेशेत संघ उपविजेता ठरला आहे.
आंबेशेत येथे या स्पर्धेचे आयोजन ऑल आंबेशेत यांच्याकडून करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा पहिला सेमी फायनल सामना तेजप्रकाश आलीमवाडी विरुद्ध आरोही स्पोर्ट आंबेशेत या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यामध्ये आरोही स्पोर्ट संघाने सलग दोन सेट जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. दुसऱ्या सेमी फायनल सामना यंग बॉईज विरुद्ध एल व्ही सी या दोन संघांमध्ये झाला. दुसरा सेमी फायनल सामना अत्यंत अटीतटीचा झाला. अटीतटीच्या सामन्यात तिसऱ्या सेटमध्ये एल व्ही सी संघाने 15 -12 अशा फरकाने तिसरा सेट आपल्या नावावरती करत फायनल मध्ये प्रवेश मिळवला.
स्पर्धेचा अंतिम सामना आरोही स्पोर्ट आंबेशेत विरुद्ध एलव्हीसी यांच्यात झाला. अंतिम सामन्यात एलव्हीसी संघाने सलग दोन सेट मध्ये आरोही स्पोर्ट संघावरती मात करत अंतिम विजेता ठरला. विजेता एल व्ही सी
संघ आणि उपविजेत्या आरोही स्पोर्ट्स संघाला रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आले. तसेच स्पर्धेचा बेस्ट लिफ्टर म्हणून एल व्ही सी संघाचा उमेश सावंत, बेस्ट स्मॅशर साहिल साठविलकर आणि बेस्ट लिबेरो म्हणून सुयश गिडीये आणि या स्पर्धेचा ऑलराऊंडर म्हणून अवधूत सनगरे यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी या स्पर्धेसाठी आरोही स्पोर्ट संघाचे मालक अमोल अनिल घोसाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे आयोजकांकडून सांगण्यात आले.