रत्नागिरी:- सरपंच झाल्यापासून निवळीचे उपसरपंच संजय निवळकर हे मला विविध ऑफर देत होते. त्यांच्या ऑफर मी धुडकावून लावल्यामुळेच त्यांनी मला त्रास देण्यासाठी जातीवाचक शिविगाळ केल्याची खोटी तक्रार ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल केली आहे. गावसभा झाली तेव्हा गावातील अनेक ग्रामस्थ तेथे हजर होते. यावेळी श्री. निवळकर यांनीच मला व कुटुंबियांना गाडी खाली चिरडून मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मी शिविगाळ केली की नाही हे ग्रामस्थच सांगू शकतील. मात्र त्यांनी दिलेल्या तक्रारीची शहानिशा करुन ग्रामीण पोलीसच मला न्याय देतील असा विश्वास निवळी सरपंच सौ.तन्वी कोकजे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
निवळ गावाचे उपसरपंच संजय निवळकर यांनी माझ्या विरोधात खोटी तक्रार ग्रामीण पोलीस स्थानकात केली आहे. श्री.निवळकर यांनी ग्रामपंचाय सदस्य पदाचा उमेदवाराचा अर्ज बाद केल्यामुळे मानकर्यांनी गावाची सभा बोलावली होती. त्या सभेत श्री. निवळकर हेच मला व माझे सासरे, पती यांना शिविगाळ करत होते. यावेळी गावातील जेष्ठ व्यक्ती त्यांना समजविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ते एकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
मी व माझ्या कुटुंबियांनी केव्हाही जातीभेद केलेला नाही. त्यामुळे मी श्री.निवळकर यांना जातीवरुन शिविगाळ करण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही. ज्यावेळी मी शिविगाळ केली असे श्री.निवळकर सांगत आहेत. त्याच सहानेच्या ठिकाणी संपुर्ण गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी श्री. निवळकर यांनी मला व माझे सासर, पती यांना गाडीखाली चिरडून मारण्याची धमकी दिल होती. त्यामुळे तेथे उपस्थित असलेले ग्रामस्थही याबद्दल सांगू शकतात. श्री. निवळकर यांनी माझ्यावर आरोप करण्यामागील कारणे वेगळी आहेत.बत्यांनी दिलेल्या ऑफर मी धुडकावल्याच्या रागातून त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केल्याचे तन्वी कोकजे यांनी सांगितले.
त्यांनी दिलेल्या ऑफर बद्दल मी गावातील मानकर्यांना माहिती दिली होती. त्यांनी गावातील विषय गावातच मिटवू सांगितल्यामुळे त्यावेळी मी पोलीस स्थानकात तक्रार दिली नसल्याचे सौ.कोकजे यांनी सांगितले.मात्र ग्रामीण पोलीसांवर माझा पुर्ण विश्वास आहे.ते मला न्याय देतील असा विश्वास सौ. कोकजे यांनी व्यक्त केला.