रत्नागिरी:- शहरातील एसटी बसस्थानक समोरील एका हॉस्पिटल जवळ मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप प्रकाश रजपुत (४०, रा. गवळीवाडा, धनजीनाका रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका हॉस्पिटल जवळ मटका जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईंत संशयिताकडे १ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल सापडला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.