एसटी चालकाला केबिनमध्ये घुसून बेदम मारहाण प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका

रत्नागिरी:- शहरातील प्रादेशिक मनोरूग्णालय समोरील रोडवर एसटी बसचालकाला केबीनमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना घडली होत़ी. या मारहाण प्रकरणात चालक आणि वाहकाने दिलेल्या जबाबातील विसंगतीमुळे आरोपिंची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल़ी. 

साईश प्रमोद जोशी (22, फगरवठार रत्नागिरी ) व शुभम दीपक सावंत (23, हिंदू कॉलनी रत्नागिरी) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश बीले यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा. अप्पा गणपत कापडी (39, ऱा सावंतवाडी) असे मारहाण करण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे. यापकरणी कापडी यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तकार दाखल केली होती.

खटल्यातील माहितीनुसार एसटी बसचालक कापडी हे मंगळवारी आपल्या ताब्यातील बस (एमएच 20 बीएल 3213) सावंतवाडी ते रत्नागिरी अशी चालवून घेवून येत होत़े. रत्नागिरी बसस्थानकाकडे जात असताना कापडी यांनी प्रवासी उतरविण्यासाठी जिल्हा परिषद थांब्याजवळ बस उभी केली होत़ी यावेळी प्रवासी उतरल्यानंतर बस पुढे घेवून जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीचालकाची बसच्या उजव्या बाजूला धडक बसल़ी. या धडकेनंतर दुचाकीस्वार व बसचालक यांच्यात बाचाबाची झाल़ी  

यावेळी साईश जोशी व शुभम सावंत यांनी आपल्याला केबीनमध्ये घुसून मारहाण केली अशी तक्रार बसचालक कापडी यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी भादवि कलम 353, 332, 504, 506 सह 34 नुसार गुन्हा दाखल केल़ा. शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े. मात्र बस चालक आणि वाहक या दोघांच्याही जबाबात विसंगती आढळली.

बस चालक अप्पा कापडी यांनी न्यायालयापुढे जबाब देताना सांगितले की, घटनेच्या दिवशी दोघांनी मारहाण केली. तर बसमधील वाहक संदीप गुणाजी मुळीक यांनी आपल्या जबाबांत सांगितले की, कापडी यांना एकाने मारहाण केली. त्यामुळे दोघांच्या साक्षीमध्ये विसंगती असल्याचे न्यायालयाने निकालपत्रात नमूद करत दोन्ही आरोपिंची निर्दोष मुक्तता केल़ी  

तक्रारदार व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीतील नसल्याने तपासादरम्यान पोलिसांकडून ओळख परेड घेणे गरजेचे होत़े, मात्र यासंबंधी पोलिसांकडून ओळखपरेड घडवून आणली नाह़ी तसेच याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देखील पोलीस न्यायालयापुढे देवू शकले नाहीत़ असे न्यायालयाने नमूद केले आह़े.