रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील एका घरात घुसत चार ते पाच राजस्थानी वेशातील महिलांनी मंगळसूत्र व अंगठी चोरुन नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
या संशयित महिलांनी मंगळवारी दुपारी आपल्या सोबत काही लहान मुलांना घेऊन एमआयडीसी येथील कॉनफोर्ड इंडस्ट्रीज येथील एका घरात घुसून तेथील महिलेकडे पैशांची मागणी केली. त्या महिलेने त्यांना नकार दिल्यानंतर त्या संशयित महिलांनी त्या महिलेच्या कपाटातील मंगळसूत्र व अंगठी जबरदस्तीने घेऊन गेल्या. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
दरम्यान, या महिलांबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.