रत्नागिरी:- जिल्ह्यात सर्वत्र भिषण पाणी टंचाईचे संकट असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी शहरातही तिच परिस्थिती आहे. परंतु रत्नागिरी एमआयडीसी मात्र यंदा याला अपवाद ठरली आहे. कोणतीही पाणी
कपात न करता पूर्ण क्षमतेने २५ मे पर्यंत पाणी पुरेल एवढा ०.७५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा धरणांमध्ये आहे. २५ मेनंतर मात्र परिस्थिती बघुन पाण्यात कपात करावी लागणार आहे. एमआयडीसीच्या वरिष्अ आधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
गेल्या पावसाळ्यात अलनिनको वादळाच्या प्रभावामुळे कमी प्रमाणात पाऊस झाला. याचा मोठा परिणात धरणांमधील पाणी साठ्यावर झाला. आता उन्हाळ्यापूर्वीच राज्याबरोबर जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट जणवू लागले आहे. रत्नागिरी पालिकेने तर गेल्या महिन्यांपासूनच पाण्यामध्ये कपात केली आहे.
आठवड्यातून २ दिवस पाणी कपात सुरू आहे. एमआयडीसी उद्योगांसह बाजूच्या नऊ ग्रामपंचायतीना दरदिवशी सुमारे ९ एमएलडी पाणी पुरवठा करते. घाटीवळे, अंजणारी, निवसर, आणि हरचेरी या चार धऱणामधून पाणीसाठा करून हे पाणी पुरवले जाते. यामध्ये दोन छोटे डॅम देखील असून त्यामध्येही पाणीसाठा आहे. सध्या घाटीवळे धरण रिकामे झाले आहे. तर अंजनारी धऱणामध्ये ७० टक्के पाणी साठा शिल्लक आहे. निवस धरण १०० टक्के भरलेले आहे तर हरचेरी धरणामध्ये १५ दिवस पुरेल एवढा पाणी साठा आहे. एकुण पाणीसाठा ०.७५० दशलक्ष घनमीटर एवढा आहे. कोणतीही कपात न करता पुर्ण क्षमतेने २५ मे पर्यंत पुरेल एवढा हा साठा आहे. त्यानंतर परिस्थितीचा विचार करून पाणी कपातीचा निर्णय एमआयडीसीला घ्यावा लागणार आहे.