गुहागरमध्ये तिघांना रंगेहात पकडले
गुहागर:- गुहागर तालुक्यातील मुंढर येथून दोघांकडून वाघ आणि बिबट्याची तब्बल १८ नखे स्थानिक अन्वेषण विभागाने जप्त केली असून दोघांना अटक केली आहे.
गुहागर येथील मुंढर येथे काही इसम वन्य प्राणी वाघ याची नखे विक्री करीता घेऊन येणार आहेत. या बातमीच्या आधारे मुंदर फाटा ते गिम्हवी या रस्त्यावर दोन इसम एका मोटार सायकलसह संशयास्पद असलेले दिसले. त्यांची झडती घेतली असता दोन इसमांपैकी दिलीप सिताराम चाळके (वय ४० वर्षे, रा. चाळकेवाडी, मुंढर, ता.गुहागर) याचे ताब्यातुन वन्य जीव वाघ व बिबट्याची १८ नखे जप्त करण्यात आली. या बरोबरच या आरोपींकडे असलेली मोटर सायकल व मोबाईल फोन अशी वर नमूद नख्यांची किंमत वगळता ५८,०००/ – रु. ची मालमत्ता जप्त करण्यात आली.
सदर बाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.ह.वा. शांताराम रामचंद्र झोरे यांच्या फिर्यादीवरुन गुहागर पोलीस ठाणे येथे कलम ३९, ४४, ४८, ५१ वन्य जीव प्राणी संरक्षण अधिनियम, १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गह्यन्ह्णात वर नमूद संशयित आरोपी दिलीप सिताराम चाळके व अक्षय आत्माराम पारधी (वय २४ वर्षे, रा. आमशेत, पेवे, भोईवाडी, ता. गुहागर) यांना अटक करण्यात आली आहे.
सदर गह्यन्ह्णाचा तपास पोलीस उप निरीक्षक, गुहागर दीपक कदम हे करीत आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली सदर कामगिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.हे.कॉ.शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, नितीन डोमणे, बाळू पालकर, उत्तम सासवे, दत्तात्रय कांबळे यांनी सहभाग घेतला. सदर कारवाईत वनरक्षक संजय बाबुराव दुंडगे यांनी सहभाग घेतला .
वन्य जीव कायद्यासहित पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्य जीव संरक्षण का आवश्यक आहे याची माहिती देण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते आणि नवी मुंबईचे क्षेत्रीय उपनिदेशक, डब्लुसीसीबी योगेश निळकंठ यांचे पुढाकाराने दि .१५ जून रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्यिल्ह्णातील पोलीस अधिकाºयांसाठी वन्य जीव संरक्षणाच्या अनुषंगाने वेबीनार आयोजित केला होता. या वेबीनारमध्ये या अनुषंगाने वन्य जीव संरक्षणाच्या अनुषंगाने कारवाई तीव्र करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी दिले होते.