उभ्या ट्रकला रिक्षाची मागून धडक; रिक्षा चालकाचा मृत्यू 

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला  रिक्षाने पाठीमागून धडक देत अपघात केला. यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून रिक्षेतील दोन जखमी प्रवाशांना उचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाताची ही घटना मंगळवारी सकाळी 5.15 वा.सुमारास घडली.

दिपक दत्ताराम मांडवकर (32,रा.करबुडे,रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी भाडे नसल्याने ट्रक चालक सागर प्रकाश जाधव (27,सध्या रा.कारवांचीवाडी रविंद्रनगर,रत्नागिरी) यांनी आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-08-एपी-4959) कारवांचीवाडी ते हातखंबा जाणार्‍या रस्त्याच्या कडेला हॉटेल कोकणी अंगण समोर उभा केला होता. त्यानंतर ते घरी गेले असता मंगळवारी पहाटे 6 वा.सुमारास त्यांना एक फोन आला.फोन करणार्‍याने तुमच्या ट्रकला रिक्षाने धडक देत अपघात केल्याची त्यांना माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी ट्रक पार्क केलेल्या ठिकाणी धाव घेतली असता त्यांना आपल्या ट्रकच्या पाठीमागे उजव्या बाजुस रिक्षा (एमएच-48-एन-8265) ने धडक देत अपघात केल्याचे दिसून आले.या अपघातात चालक आणि रिक्षेतील दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेेने जिल्हा शासकिय रुग्णालयात नेेले असता वैद्यकिय अधिकार्‍यांनी रिक्षा चालक दिपक मांडवकर यांना तपासून मृत घोषित केेले.अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.