उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेगा पक्षप्रवेश: ना. सामंत

रत्नागिरी:- राज्यातील ‘ऑपरेशन शिवधनुष्य‘चा आरंभ जानेवारीत रत्नागिरी मतदारसंघातून होऊन उबाठातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेगा पक्षप्रवेश शिवसेनेत झाला होता. आता पुन्हा एकदा ठाकरे शिवसेनेला खिंडार पाडण्यासाठी 15 फेब्रुवारी रोजी शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. ह्या दौऱ्यात उबाठातील अनेकजणांचा पुन्हा एकदा मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रत्नागिरी दौऱ्यावर शनिवार असलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा आभारासाठी आहे. या दौऱ्यासाठी नियोजन आणि येथील शिवसेना कार्यकारिणी बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. या आभार दौऱ्यात शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठातील अनेक पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, विद्यमान पदाधिकारी देखील शिवसेनेत पक्षप्रवेश करतील असे सामंत यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रवेशाची शृंखला ही अशा कायम राहणार आहे. पण रत्नागिरीतील उबाठाचे ज्येष्ठ नेते, संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, राजापूरचे गणपत कदम यांनी नुकतीच काशिनाथ घाणेकर सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्या भेटीत शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा देखील झाली आहे. त्यामुळे उबाठा सोडून एकनाथ शिंदेचे नेतृत्व स्विकारतील असं मानायला हरकत नसल्याचे सामंत यांनी सांगितले.

गेल्या जानेवारी महिन्यात उबाठा गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्यासह माजी जि.प. सभापती, सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या माध्यमातून ‘मिशन टायगर’ हाती घेण्यात आले आहे. आता आम्ही ठाकरे शिवसेनेला खिंडार पाडायला प्रारंभ केला असल्यो सामंत यांनी सांगितले आहे. शिवसेनेकडून आम्ही कोणतेही आमिष न दाखवता अनेक जण मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेत आहेत. त्यामुळे आम्ही कोणाला फोडत नाही, कोणाला शिवसेनेत येण्याचा आग्रह देखील करत नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असल्याचे सिध्द झाल्यावर उबाठातील कार्यकर्त्यांना कळून चुकलं आहे. आता मशाल सोडून धनुष्यबाण हाती घ्यावा लागेल. त्यामुळे आम्ही शिवसेनेत येणाऱ्यांसाठी कुणावरही जबरदस्ती करणार नसल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. दिल्लीत जी वज्रमुठ दाखविण्यात आली असल्यो संजय राउत यांनी विधान केले होते. पण माझ्या मनात काय चाललंय ते समोरचा ओळखू शकलेला नाही, तसं उबाठातील त्या आठ खासदारांच्या मनातील कोण ओळखू शकणार?, त्यांची वज्रमुठ काय आणि किती दिवस टिकणार हे पहावे लागेल असेही सामंत म्हणाले.

लाडकी बहीण योजना मागील विधानसभा निवडणूकाच्या काळात आचारसंहिता होती. त्यामुळे छाननीला वेळ लागला होता. पण ही योजना बंद होईल असा गैरसमज विरोधकांतून पसरवला जातोय, त्यात काहीही अर्थ नाही. उदय सामंत, पालकमंत्री तथा राज्य उद्योगमंत्री म्हणाले.

राजापूर-लांजा-साखरपाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चेचे जोरदार गुरहाळ सुरू आहे. पण साळवी हे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, याची मला पालकमंत्री म्हणून माहिती नाही. कदाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ती माहिती असेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाबाबतीत सामंत यांनी म्हटले की, साळवी 10 फेब्रुवारी रोजी शिवसेनेत पक्षप्रवेश करतात, याची कुठलीही माहिती आपल्याला नाही. याबाबत माझी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांयात चर्चा झालेली नाही. साळवी पक्षप्रवेश करतात की नाही हे कदाचित शिंदे यांना माहित असेल, पण मला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.