रत्नागिरी:- यंदा उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. उन्हाची दाहकता दिवसभर जाणवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होवू नये, त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत दि. 17 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत.
सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. त्यातच उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्याच्या काही भागात पाण्याचा प्रश्नही भेडसावू लागला आहे. विद्यार्थ्यांना उन्हामध्ये ये-जा करावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाच्या झळा बसू नयेत. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळा या पत्र्याच्या आहेत. त्यामुळे तीव्र उन्हाचा विद्यार्थ्यांना त्रास होवू शकतो. परिणामी, उन्हाळ्यात वाढत्या तापमान आणि उन्हाच्या झळा यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच प्राथमिक शिक्षण विभागाच्या वार्षिक याच्या वेळापत्रकात 15 मार्च नंतर सकाळच्या सत्रात सकाळी 7.20 ते 11.30 या वेळेत शाळा भरवण्यात यावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत.
बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)दरवर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार मार्च महिन्यात प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवली जात आहे. आता दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढू लागली आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सकाळी 7.20 ते 11.30 या वेळेत भरवण्यात येत आहेत.