उद्यमनगर राजापूरकर कॉलनी येथे तरुणीची गळफास घेत आत्महत्या 

रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथील राजापूरकर कॉलनी येथे तरुणीने राहत्या घरी अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली असून सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलीस स्थानकात याबाबत नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.

सायमा समीर सोलकर (२६,रा.राजापूरकर कॉलनी,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सायमा आपल्या घरी एकटीच रहात होती. मंगळवारी दुपारी तिच्या शेजार्‍यांना सायमा राहत्या घरी फॅनला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.त्यांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्‍तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.