उद्यमनगर येथून अल्पवयीन मुलगा बेपत्ता

रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथून अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. हा मुलगा गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून बेपत्ता आहे. सहान सलीम शेख (१२, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे.

गुरुवारी सकाळी ८.३० वा सहान बाहेर खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. हा मुलगा घरातून तिघून गेल्यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या घरच्यांसह नातेवाईकांनी आजुबाजुला तसेच त्याच्या मित्रांकडे त्याची चौकशी केली परंतू सहान याचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर सहानच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.