उक्षी पोटनिवडणुकीत 63.09 टक्के मतदान

रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी येथे झालेल्या पोटनिवडणुकीत गुरुवारी 63.09 टक्के मतदान झाले. शुक्रवारी मतमोजणी होणार असून, या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट बाजी मारणार काय याकडे लक्ष लागून राहिले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथे गुरुवारी एक व दोन प्रभागांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. काही महिन्यापूर्वी सरपंच वगळता सर्वच सदस्यांनी राजिनामा दिला होता. त्यामुळे याठिकाणी पोट निवडणूक जाहीर झाली होती. यामध्ये दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर दोन प्रभागांमध्ये निवडणूक झाली. यात सकाळी 7.30 पासून सायंकाळी 5.30पर्यंत 63.09 टक्के मतदान झाले. प्रभाग 1मध्ये 585 पैकी 419 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर प्रभाग 2मध्ये 393 पैकी 198 मतदारांनी हक्क बजावला. गावच्या या निवडणुकीत सर्वाधिक मतदान महिलांनी केले. या निवडणुकीत शिंदे गट वर्चस्व राखणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.