उक्षी घाटातील फार्म हाऊसवर 18-20 जणांच्या टोळीकडून चोरी

चोरटे सीसीटिव्हीत कैद, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील उक्षी घाटातील फार्म हाऊसवर चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. 18-20 जणांचे टोळके चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. ही घटना शनिवारी पहाटे 2.30  वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेच्या उक्षी घाटातील फार्महाऊवर चार चाकीतून आलेल्या 18 ते 20 जणांनी चाल केली. चोरीच्या उद्देशाने हे चोरटे परिसरात फिरत असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत चार चाकीतून उतरताना तसेच तोंडाला मास्क बांधलेले असे ते चोरटे फार्म हाऊस वरील नारळाच्या झाडांवर चढताना दिसत आहेत.तसेच या परिसरातील नारळ त्यांनी चोरून नेले. चोरट्यांनी शिडीच्या साहाय्याने झाडावर चढून नारळ काढले आणि ते शिडी नेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत.

रविवारी सकाळी या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कामगार साफसफाई करत असताना ही घटना निदर्शनास आली. त्याने आपल्या मालकालाही हकीकत सांगितली. त्यानुसार मालकाने सीसीटीव्ही फुटेज चेक केली असता पहाटेच्या सुमारास चार चाकी वाहनातून चोरटे उतरत असून 18 ते 20 चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आले आहेत. नारळाच्या झाडावर चढून नारळ काढताना दिसत आहेत तर काही जणांनी तोंडावर मास्क बांधलेले दिसत आहे.

या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन रत्नागिरी यांच्याकडे दिली असून सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.