रत्नागिरी:- आमदार उदय सामंत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जात असताना त्यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला. उदय सामंत यांच्यावर झालेल्या या हल्ल्याची बातमी रत्नागिरीत धडकताच रत्नागिरी शहरात सर्वत्र हल्ल्याचा निषेध करणारे बॅनर झळकवण्यात आले आहेत.
10 ते 15 फुटाच्या या बॅनर वर आमदार उदय सामंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध! विचारांची लढाई ही विचारांनीच लढायची असते. असे हल्ले करणारे भ्याडच ! अशा प्रकारे निषेध व्यक्त करणारे बॅनर शहरात साळवी स्टॉप पासून झळकवण्यात आले आहेत.