रत्नागिरी:- येथील आर्यन क्लबतर्फे कै. दिगंबर नाचणकर स्मृती चषक खो-खो लिग स्पर्धेचे आयोजन 4 व 5 जून या कालावधीत करण्यात आले आहे. आर्यन क्लबच्या खेळाडूंची ही स्पर्धा असून यामध्ये चार संघाचा समावेश आहे. ही स्पर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर होणार आहे. शनिवारी (ता. 4) सायंकाळी 5 वाजता स्पर्धेला आरंभ होईल तर समारोप रविवारी होईल.
गेली अनेक वर्षे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू घडवणार्या आर्यन क्लब मार्फत नियमित सराव घेतला जातो. मे महिन्यातही उन्हाळी सराव शिबिराचे आयोजन केले होते. नियमित सरावासाठी येणार्या खेळाडूंना स्पर्धेचा अनुभव मिळावा यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. भविष्यात दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.