रत्नागिरी:- आर्जु टेकसोल कंपनीचे चांगलेच दिवाळे निघाले आहे. तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एमआयडीसीतल सुसज्ज ऑफिस, एक प्रशिक्षण केंद्र, गोदाम सील केली आहेत. मशीनरीसह कच्चा, पक्का असा सुमारे ४ कोटीचा माल त्यामुळे पडुन आहे. हे सर्व भाड्याने घेतले असल्याने कंपनीची वैयक्तीक मोठी मालमत्ता नसल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारांची रिघ सुरूच आहे. बुधवारी ४० गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यावरून या कंपनीची व्याप्ती मोठी असून गुंतवणूकदाराना कोट्यवधीची फसवणूक केल्याचे निष्पन्न होत आहे. एमआयडीसीत जे ती जागा भाड्याने घेतल्या आहेत. त्यापैकी फक्त एका जागेसाठी कंपनीने एमआयडीसीची परवानगी घेतली आहे. उर्वरित दोन जागेसाठी कोणतीही परवानगी नाही. त्यामुळे या तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी ऑफिस, ट्रेनिंग सेंटर, गोदाम सील केले आहे. कंपनीची दुसरी बाजू पुढे येत आहे. कंपनी कच्चा माल देऊन बनवलेला पक्का माल स्वतः घेऊन तो मार्केटमध्ये विकला जात होता. परंतु अनेक ग्राहकांनी बनविण्यासाठी दिलेल्या मालांपैकी ६० टक्केच्या वर माल खराब केला आहे. त्यामुळे तो माल कंपनी घेऊन आपला तोटा करून घेणार नाही. त्याचा बोजा गुंतवणूकदारावरच पडला आहे. तसेच काही गुंतवणूकदारांचा परतावाही दिला आहे. काही १० ते २० हजारासाठीही तक्रारी येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. उदाहरणार्थ २ लाख दिले तर कंपनीने १ लाख ९० हजार परत दिले आहेत. परंतु १० हजारासाठीही तक्रारी झाल्याचे तपासात पुढे आले आहे. आतापर्यंत दीड कोटीच्या वर फसवणुकीचा आकडा गेला आहे. परंतु कंपनीकडे अजुनही ४० ते ५० लाखाच्या मशनरीसर कच्चा, पक्का असा ४ कोटीचा माल पडून असल्याचे समजते.