रत्नागिरी:- प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) वाहन निरीक्षकांकडून होणारी वाहनांच्या तंदुरूस्तीची तपासणी (व्हेईकल फिटनेस टेस्ट) लवकरच इतिहासजमा होणार आहे. ही तपासणी स्वयंचलित पद्धतीने करून वाहनांना योग्यतेचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी स्वयंचलित तपासणी व प्रमाणपत्र केंद्रे (सेल्फ सेंटर) सुरू होणार आहेत.
जेव्हा आपण एखाद्या शोरूममधून नवीन वाहनाची खरेदी करत असतो तेव्हा आपणास त्या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र देखील दिले जात असते. हे प्रमाणपत्र काही ठाराविक कालावधीसाठी वैध ठरत असते. हा कालावधी संपल्यानंतर आपणास मोटार वाहन कायद्याचे नियमांचे पालन करण्यासाठी आपले वाहन फिटनेस सर्टिफिकेट हे रिनिव्ह करावे लागते म्हणजे त्याचे नूतनीकरण करावे लागते.
हे वाहन फिटनेस प्रमाणपत्र रिनीव्ह करत असताना आरटीओ कडून आपल्या वाहनांची तपासणी केली जाते. आरटीओतील वाहन निरीक्षकांवर ही जबाबदारी असते. रिक्षा, टॅक्सी, ई-टॅक्सी, स्कूलबस, प्रवासी बस, मालमोटार आणि टेम्पो या वाहनांची ही तपासणी केली जाते. यात वाहनांच्या सुरक्षाविषयक निकषांची तपासणी होते. रस्त्यावर चालण्यासाठी ते वाहन सुरक्षित आहे का आणि ते प्रदूषण करणारे आहे का, हेही तपासले जाते. आता हे काम स्वयंचलित तपासणी आणि प्रमाणपत्र केंद्राच्या माध्यमातून हाणार आ हे. आरटीओच्या निकषांच्या आधारे ही तपासणी होणार आहे.
या नियमाची अंमलबजावणी झाल्यास प्रदूषण करणार्या वाहनांची संख्या कमी होऊ शकते. तसेच,
जी वाहने खूप जुनी आहेत, तरीही बनावट मार्गाने धावत आहेत, त्यांची संख्याही कमी होईल. तसेच नवीन नियम लागू झाल्याने ट्रॅफिकसारख्या समस्याही कमी होऊ शकतात.