आरटीओ कर्मचारी संघटनेचा आजपासून बेमुदत संप

रत्नागिरी:- आकृतीबंधाची सुयोग्य अंमलबजावणी न करणे आदी अन्यायकारक तरतुदींमुळे संतप्त झालेल्या कर्मचारी वर्गाने आज २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती मोटारवाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने दिली.

गेल्या दोन वर्षात प्रशासकीय विविध अन्यायकारक तरतुदीमुळे अनेक सेवाविषयक प्रशासकीय गुंतागुंत निर्माण झाली आहे. महसूल विभागीय बदल्यांचे धोरण रद्द न करणे, विभागीय परीक्षेसारख्या संवेदनशील क्षेत्रात अनाकलनीय बदल करण्यात आले आहेत. आकृतीबंधाची सुयोग्य अंमलबजावणी न करणे आदी अन्यायकारक तरतुदींमुळे संतप्त झालेला कर्मचारी वर्ग २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहे.

या संदर्भात आरटीओ कर्मचारी संघटनेची परिवहन आयुक्तांशी झालेली चर्चा फिसकटल्याने राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी हा निर्धार सोडला आहे. महसूल विभागीय बदल्यांचे धोरण रद्द न करणे, विभागीय परीक्षेसारख्या संवेदनशील क्षेत्रात अनाकलनीय बेछूट बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतेक कर्मचारी हवालदिल झाले आहेत. आकृतीबंधाची सुयोग्य अंमलबजावणी न करणे, कामकाजात सुसुत्रीकरण येण्यासाठी नेमण्यात आलेल्या मा. कळसकर समितीच्या हितकारक कार्यपद्धतीची अंमलबजावणी न करणे, सेवाज्येष्ठता व बदल्यांचे संयोजन याबाबत कोणतीही कर्मचारीभिमुख सकारात्मक कार्यवाही न झाल्यामुळे आरटीओ कर्मचाऱ्यांनी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी संप आंदोलनाची रितसर नोटीस परिवहन आयुक्त व अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) यांना देण्यात आली आहे.


चर्चा फिसकटल्यामुळे संप आता अटळ
राज्यातील सर्व त्रस्त आरटीओ कर्मचारी कर्तव्यभावनेने, स्वतःच्या अस्तित्वासाठी संपात सहभागी होतील, असा ठाम निर्धार संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी व्यक्त केला. संघशक्तीचा नक्की विजय होईल, असा दृढ विश्वास अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला.