रत्नागिरी:- आरटीई (25 टक्के) च्या मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरण्यास थंड प्रतिसाद मिळत असल्याची बाब दिसून येत आहे. त्यामध्ये शनिवारपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 42 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोटावर मोजण्याएवढे केवळ 4 विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गेले असल्याची बाब समोर आली आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांवर ऑनालाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शनिवारपर्यंत राज्यातील सुमारे 22 हजार 472 विद्यार्थ्यांनी आरटीईचे अर्ज भरले आहेत. त्यात एकट्या पुणे जिह्यातील अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक 6 हजार 704 इतकी आहे. त्यापाठोपाठ नागपूर मध्ये 3,353 विद्यार्थ्यांचे अर्ज भरलेत तर मुंबईमध्येही 1002 विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले आहेत. मात्र, राज्यातील अनेक जिह्यातून प्रवेश अर्ज भरण्यास थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. अनेक जिह्यात यादिवसांत 100 पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. परंतु, पुढील काही दिवसांत अर्ज भरणाया विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असे शिक्षण विभागामार्पत सांगितले जात आहे.
आरटीई विद्यार्थी पवेशासाठी 16 एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. पालक येत्या 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतात. राज्यातील 76 हजार 52 शाळांमधील 8 लाख 86 हजार 394 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यातील बहुतांश शाळा या शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच आहेत. त्यामुळे किती पालक प्रवेशास पसंती देतात, याबाबतचे चित्र पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे.