आमची स्पर्धा विनायक राऊत यांच्यासोबत: ॲड. ओवेसी पेचकर

रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदरासंघात आमचा खरा प्रतिस्पर्धी हे महाविकास आघाडीचे विनायक राऊत आहेत. नारायण राणे यांच्यासह कुटुंबियाला कोकणी जनतेने दोन ते तीन वेळा नाकारले आहे. भाजपने राणेंना उमेदवारी देऊन त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, असा आरोप ॲड. ओवेसी पेचकर यांनी केला. हॉटेल सावंत पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अपक्ष उमेदवार शकील सावंत उपस्थित होते.

ॲड. पेचकर म्हणाले, कोकण प्रादेशिक पक्षाचे लोकसभा मतदरासंघातील पहिले 12 उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी शकील सावंत यांची उमेदवारी जाहिर केली. परंतु यामुळे प्रस्थापितांना पोटदुखी सुरू झाली. आमचा बुलंद आवाज दबला जाणार नाही. प्रचार करताना गावात, वाडी-वस्तीमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राजकीय प्लॅटफॉर्म मिळत असल्यानेच काही नेत्यांनी पक्ष मान्यतेमध्ये काडी घातली. आम्ही माईक हे चिन्ह मागून घेतले आहे. आमचा आवाज आता कोणही दाबू शकत नाही.
उद्धव ठाकरेंनी सेना आमच्याबाबत अपप्रचार करीत आहेत. शकील सावंत यांना उमेदवारी म्हणजे मुस्लिम समाजाची मते भाजपला होणार, असा खोटा प्रचार करीत आहेत. याबाबत आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे रितसर तक्रार दिली आहे. महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या उमेदवारांकडे विकासाचा मुद्दाच नाही किंवा व्हिजन नाही. त्यामुळे 4 जूनला काय होईल, ते आता तुम्ही बघाल, अशी प्रतिक्रिया ओवस पेचकर यांनी दिली.

गेल्या 10 वर्षांमध्ये खासदारांनी काय केले. महामार्गाचे काम रखडले आहे. केंद्रीय मंत्री आणि खासदार असतानाही देखील त्या दोघांनी या विषयाचा पाठपुरावा केलेला नाही. परंतु आम्ही महामार्गाच्या पाठपुरावा केल्यामुळे काम झाल्याचा खोटे प्रचार केला जात आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यातील एसटी बसस्थानांची कामे अपूर्ण आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीचा विचार केला जात नाही. बारामतीचे एसटी बसस्थानक विमानतळाला लाजवेल एवढे मोठे आहे. कोकणाला विकण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची येथील पॅदी करत आहेत. ‘संविधान बचाव’ हा मुद्दा घेऊन पुढे जात आहेत, असे पेचकर म्हणाले.