आधी हटवले आता पुन्हा उभे राहिले; मारुती मंदिर येथील अनधिकृत खोक्यांचा विषय चर्चेत 

रत्नागिरी:- एकीकडे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली जात असताना दुसरीकडे मारुती मंदिर येथील शौचालयाशेजारी उभ्या खोक्यांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. एका रात्रीत हे पाच खोके उभे करण्यात आले असून यात काही पती नगरसेवकांचा हात असल्याची चर्चा आहे. नगर परिषद प्रशासन या अनधिकृत खोक्यांवर कारवाई करणार का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.   

नगर परिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही हा विषय भाजपच्या विरोधकांनी उचलून धरला. मात्र त्याबाबत कोणताच ठोस निर्णय पालिकेने घेतलेला नाही. यामध्ये अनेक दिग्गजांची नावे पुढे येत आहे. याला आशिर्वाद कोणाचा, असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

कोरोनामुळे गेली काही दिवस शांत असलेल्या पालिकेतील काही विषय आता चर्चेला येऊ लागले आहेत. मारूती मंदिर येथील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील असलेली अतिक्रमण यापूर्वी नगर परिषदेने हटविली होती. तसेच रस्त्याजवळ बसणार्‍या भाजी विक्रेत्यांनाही हटवून पाठिमागे बसविण्यात होते. या विषयावरून जोरदार राजकारण झाले होते. मात्र तो विषय निवाला होता. ज्या ठिकाणीच अतिक्रमने हटविण्यात आली होती. त्याच ठिकाणी अनधिकृतपणे नवीन चार खोकी  उभारण्यात आली आहेत. हा विषय काही दिवस गाजत आहे. मात्र त्यावर उघड कोण बोलत नव्हते. सत्ताधार्‍यांच्याच जवळच्यांचा यात हात असल्याचे समजते. तसेच खोकी मिळण्यावरून अंतर्गत चढाओढही सुरू आहे.

पालिकेच्या आजच्या सभेने त्याला राजकीय वळण लागले आहे. भाजपणे हा विषय उचलून धरला आहे. तर यापूर्वी ज्या खोकेधारकांना हटविण्यात आले होते. ते खोकेधारक देखील या विषयावरून न्यायालयात गेल्याचे समजते. त्यामुळे पालिकेची चांगलीच गोची झाली आहे. आजच्या सर्वसाधारण सभेमध्येही विरोधकांनी मारूती मंदिर येथील अनधिकृत उभारण्यात आलेल्या खोक्यांचा विषय उचलून धरला. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाने ठोस उत्तर न देता विषयाला बगल दिली.