रत्नागिरी:- बुधवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 93 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोना बाधित रुग्णसंख्येने अडीच हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक 20 रुग्णांचा समावेश आहे. यासह लांजातील 1, रायपाटण 1, दापोली 12, कामथे 12, देवरुख 1, कळंबणी 16 आणि अँटीजेन टेस्ट केलेल्या 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 2 हजार 580 इतकी झाली आहे.