रत्नागिरी:- जिल्ह्यात लावण्यात आलेला लॉकडॉऊन हा कुणी लादलेला लॉकडॉऊन नसून नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे घेतलेला निर्णय आहे. आठ दिवसात रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर लॉकडॉऊनमधून सूट ही द्यावीच लागेल अशी माहिती ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
झुम अँपद्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कडक लॉकडॉऊन जाहीर करण्यापूर्वी आपण प्रत्येक तालुक्यातील व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडॉऊन हा लादलेला नसून उत्स्फूर्तपणे घेण्यात आलेला निर्णय आहे. यामुळे आठ दिवसांनी या लॉकडॉऊन मधून सूट ही द्यावीच लागेल अशी माहिती ना. सामंत यांनी दिली.