आज महामार्गावरील अवजड वाहतूक बंद

रत्नागिरी:- अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भुषण पुरस्काराने आज (ता. १६) सन्मानित करण्यात येणार आहे. या गौरव सोहळा खारघर नवीमुंबई येथे आहे. या कार्यक्रमाला १५ लाख सदस्य, अनुयायी खासगी वाहनांने, एसटी बसेस येणार आहे. त्यामुळे आज रात्री बारा वाजेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंदचे आदेश देण्यात आले आहेत.

या कार्यक्रमासाठी रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार वगैरे जिल्हातुन तसेच बाहेरील राज्यातुन सुमारे १५ ते २० लाख सदस्य , अनुयायी खाजगी वाहनांने, एसटी बसेस तसेच रेल्वेने खारघर नवीमुंबई येथे येणार आहेत. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर चौपदरीकरणाचे कामकाज सुरू आहे. य़ा महामार्गावर बऱ्याच ठिकाणी बॉटलनेक पॉईट तयार झालेले आहेत. सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने नागरिक व पर्यटक तसेच सदस्य, अनुयायी हे मोठया संख्येने आपआपली वाहने घेऊन या मार्गावरुन प्रवास करणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जूना राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर राज्य मार्ग येथील वाळू, रेती भरलेल्या ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतूकीबाबत आज (ता. १६) रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.