रत्नागिरी:- येथील बौद्धवाडीत एका प्रौढाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बाबाराम रामा सावंत असे मृताचे नाव आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबाराम सावंत यांना दारूचे व्यसन होते. काही दिवसांपासून त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू होता. त्यासाठी पालीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.