रत्नागिरी:- शहरानजीकच्या आंबेशेत येथे दुचाकी अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. किशोर महादेव पानकर (३५, रा. वाडेकरवाडी नाचणे रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर पानकर हे १ मे २०२४ रोजी दुचाकीने आंबेशेत येथून जात होते. दुपारच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने यामध्ये किशोर पानकर हे गंभीर जखमी झाले. किशोर पानकर यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालय येथे पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पानकर यांना मृत घोषित केले.