रत्नागिरी:- भोवडे (ता. संगमेश्वर) येथील प्रौढ हापूस आंबा कलमावर चढून आंबे काढत असताना तोल जाऊन पडला. उपचारासाठी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी १९ एप्रिल रोजी उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
लवेश शंकर शेलार ( ४२, रा. भोवडे, ता. संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. सोमवारी १५ एप्रिल रोजी सकाळी 8.30 वा सुमारास तो रंजन शंकर सावंत यांच्याकडे आंबा काढणीसाठी मजुरीवर गेला होता. त्याच्या घराजवळील आंबा कलमावर चढून आंबे काढत असताना तोल जाऊन पडला.त्याच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी साखरपा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.