आंजर्ले किनारी बोट बुडाली; सुदैवाने खलाशी बचावले

दापोली:- तालुक्यातील आंजर्ले समुद्रात वासुदेव वाशा दोरकुळकर यांची बोट क्रमांक- ७२४ सिद्धिसागर नावाची दोन सिलेंडरची बोट काल सोमवारी बुडाली. अमावस्येच्या भरतीला पाण्याला असलेला करंट यामुळे ही नौका बुडल्याचा अंदाज आहे. बोटीवरील खलाशांनी पोहत किनारा गाठला. 

 बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप असुन बोटीवरील दोन जण पोहून आले आहेत म्हणून ते सुदैवाने बचावले. तर अन्य दोन खलाशी दुसऱ्या बोटीने किनाऱ्यावर परतले. 

दरम्यान, दापोली तालुक्यात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. अजुन एक बोट किनाऱ्यावर लगली आहे ती बोट बुडण्याचा धोका होता मात्र ही बोट वाचवण्यात यश आले आहे. प्रकाश दोरकूळकर यांची बोट दुसऱ्या बोटीच्या मदतीसाठी गेली होती. इंजिन बंद पडल्याने ही बोट बुडणार होती. किनाऱ्याजवळ असल्याने यातील खलाशांनी उड्या टाकुन जवळच किनारा गाठला. दरम्यान या बोटीलाही वाचवण्यात यश आले. सलग तिसऱ्या वर्षी हा प्रकार या परिसरात घडला आहे.दरम्यान या घटनेचे वृत कळताच बंदर अधिकरी दीप्ती साळवी व काही अधिकारी,पोलीस घटनास्थळाकड़े रवाना झाले आहेत.