रत्नागिरी:- तालुक्यातील खंडाळा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या बल्गरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दहा वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालविणारे आजोबा जखमी झाले आहेत. या चिमुरड्याच्या अपघाती मृत्यूनंतर स्थानिकांनी ग्रामस्थ आक्रमक होत रस्तारोको केला होता. यामुळे खंडाळा परिसरात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत पोलीसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली होती.
सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. बल्गर भरधाव वेगाने घेवून जात असताना सायंकाळच्या सुमारास खंडाळा महावितरण कार्यालया जवळ दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. बल्गरची धडक जोरात बसल्याने दुचाकीवर मागे बसलेला दर्शिल प्रमोद सावंत या शाळकरी चिमुरड्याचा रस्त्यावर आदळून जागीच मृत्यू झाला तर आजोबा रामचंद्र सावंत हे जखमी झाले आहेत.
कोळीसरे येथील माजी सैनिक म्हणून ओळखले जाणारे आर डी तथा रामचंद्र देमाजी सावंत हे आपल्या ॲक्टिवा दुचाकी गाडीने कोळीसरे ते खंडाळा या ठिकाणी आपल्या खाजगी कामानिमित्ताने चालले होते चालले होते. मात्र कोळीसरे ते खंडाळा असे जात असताना खंडाळा येथील महावितरणच्या कार्यालयासमोर एका बल्गरने पाठीमागून अचानक येऊन त्यांच्या गाडीला ठोकर दिल्याने त्यांचा पाठीमागे बसलेला नातू जागीच गतप्राण झाला. या अपघाताची माहिती मिळताच कोळीसरेसह संपूर्ण खंडाळा परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात एकवटून त्यांनी रास्तारोको केला. पोलीसांचे वरिष्ठ अधिकारी रात्री खंडाळा येथे दाखल झाले होते.