रत्नागिरी:- अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणार्या संशयित माजी जेल पोलिसाची शुक्रवारी न्यायालयाने जामिनावर मृक्तता केली.
अशोक गणपत भडकमकर (67,रत्नागिरी) असे जामिनावर मुक्तता करण्यात आलेल्या संशयित माजी जेल पोलिसाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पिडितेच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अशोक भडकमकरने मंगळवार 26 मार्च रोजी त्याच्या परिसरातील एका अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर ही बाब कोणालाही सांगितल्यास याद राख अशी धमकिही तिला दिली.
या सर्वप्रकाराने घाबरलेली अल्पवयीन मुलगी घरी जाउन रडू लागली. तिच्या आईने तिची चौकशी केल्यावर तिने घडलेली सर्व हकिकत आपल्या आईला सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या पालकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत अशोक भडकमकर विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम 354 (अ),(ड),506 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8,12 अन्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संशियिताला अटक केली होती. दरम्यान भडकमकरने न्यायालयात जामिन अर्ज केला होता. त्यावर सुनावणी करत शुक्रवारी न्यायालयाने त्याची जामिनवर मुक्तता केली.