अल्पवयीन मुलीला पळवून नेत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरी

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील नाणार येथील अल्पवयीन १६ वर्षीय मुलीला पळवून नेत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी १० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

विजय बाळू चव्हाण (वय २३, मूळ रा. नाशिक, सध्या रा. नाणार, राजापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पिडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विजय चव्हाण मूळचा नाशिक येथील असून, तो कामानिमित्त नाणार येथे वास्तव्याला होता. नाणार येथेच पीडितेसोबत ओळख निर्माण झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. यातूनच २२ ऑक्टोबर २०२१ रोजी विजयने पिडीतेला फूस लावून नाशिक येथे नेले. तिला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात विजय विरोधात भादंवि कलम ३६३, ३७६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पॉक्सो) चे कलम ४ व ८ नुसार गुन्हा दाखल करयात आला होता. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.