अलोरे शिरगाव पोलिसांकडून चौघे दरोडेखोर जेरबंद

रत्नागिरी:- वृद्धेच्य गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन पळून जाणाऱ्या चौघा दरोडेखोरांना फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडण्यात आले. अलोरे शिरगाव पोलिसांनी ही कारवाई केली. वृद्धेने तक्रार दिल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी चौघांच्या टोळीला जेरबंद केले.

सूरज समाधान काळे (वय 21 रा. कुंभारी, ता. जिल्हा उस्मानाबाद), सरस्वती सूरज काळे (वय 21 कुंभारी, ता. जिल्हा उस्मानाबाद), राहुल अनिल शिंदे (वय 35 रा. सारोळे, ता. बार्शी जि. सोलापूर ) व कामिनी राहुल शिंदे (वय 32 रा. सारोळे, ता. बार्शी जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

26 जुलै रोजी सकाळी 9.00 वा. अलोरे शिरगांव पोलीस ठाणे हद्दीमधील चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक मधील असणाऱ्या आपल्या खात्यामधील फॅमिली पेंशनची काही रक्कम काढण्यासाठी मुंढे, चिपळूण येथील राहणाऱ्या 65 वर्षीय जेष्ठ नागरिक महिला आपल्या वाडीतील राहणाऱ्या अन्य एका जेष्ठ नागरिक महिले सोबत मुंढे एस.टी. स्टॉप येथून शिरगांवला जाण्यासाठी एसटी ची वाट पहात हो्या. यावेळी एक पोपटी (हिरव्या) रंगाची कार त्यांच्या बाजूला येऊन थांबली. गाडीमधील बसलेल्या चालकाने तुम्हाला कुठे जायचे आहे असे विचारून त्यांना गाडीत पुढे बसण्यास सांगितले. गाडीत पुरेशी जागा नसल्याचे सांगून सोबत असलेल्या जेष्ठ नागरिक महिलेस गाडी मध्ये घेतले नाही. काही अंतरावर गेल्यावर गाडी मधील बसलेल्या एका महिलेने तसेच एका इसमाने त्यांच्या गळ्यातील 93 हजार 500 रूपये किंमतीची सोन्याची माळ जबरदस्तीने खेचत जिवे मारण्याची धमकी दीली. या
नतर त्यांना शिरगांव येथील ब्राह्मणवाडी जवळ त्यांना गाडीतून खाली उतरविण्यात आले.

मुंढे, चिपळूण येथे राहणाऱ्या या 65 वर्षीय महिलेने लागलीच मागून येणाऱ्या एस.टी. बसने अलोरे शिरगांव पोलीस ठाणे गाठले. आपली तक्रार देऊन सदर गाडीचा नंबर 1657 असल्याचे व यातील असणाऱ्या व्यक्तींचे वर्णन पोलीसांना सांगितले.
या मिळालेल्या माहितीच्या आधारे अलोरे पोलीसांमार्फत लागलीच नाकाबंदी करण्यात आली. या गाडीचा पाठलाग करून कुंभार्ली घाटामध्ये शिताफीने गाडी व गाडीतील सर्वांना पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध अलोरे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 50/2023 भा.द.वि. संहिता कलम 394, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दखल करण्यात आला व.गुन्ह्यातील जबरीने चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.