रत्नागिरी:- शहरातील अभ्युदयनगर येथील सुरेशा पॉइंट येथील जागेवरील लोखंडी पेटीत ठेवलेल्या एका कंपनीच्या ८६ हजार ४०० रुपयांच्या मोबाईल टॉवरच्या २४ बॅंटऱ्या अज्ञात चोरट्याने पळविल्या. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ जानेवारी सकाळी दहा ते दुपारी दोनच्या सुमारास अभ्युदयनगर येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महेंद्र कृष्णा साळवी (४२) यांनी अभ्युदयनगर येथील सुर्यास्त पॉईट येथील सुरेश कृष्णा शेलार यांच्या मालकीच्या उघड्या जागेवर लोखंडी पेटीतील इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवरला पॉवर सप्लाय देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येकी २ होल्टच्या ८६ हजार ४०० रुपयांच्या २४ बॅंटऱ्या अज्ञात चोरट्याने पळविल्या. या प्रकरणी महेंद्र साळवी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.