रत्नागिरी:- तालुक्यात नव्याने 31 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात पावस, अभ्युदयनगर आणि करबुडेत कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसून येत आहे.
शहरातील अभ्युदयनगर येथे नव्याने तीन रुग्ण सापडले आहेत. मागील काही कालावधी पासून या भागात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. याशिवाय पावस परिसरात देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. येथे आणखी 2 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय करबुडे येथे देखील तीन रुग्ण सापडले आहेत. याशिवाय रत्नागिरी शहर 2, सावर्डे 1, चिपळूण 2, वायंगणी 1, राजापूर गोठणे 1, कारवांचीवाडी 1, कुवारबाव 1, सहकार नगर 1, चर्मालय 1, देवरुख 1, खेडशी नाका 1, स्टेट बँक कॉलनी 1, नेवरे 2, देवरुख 1, खेड 1, साखरपा 1, जयगड जांभारी 1, राजिवडा, गयाळवाडी 1 आणि गुहागर मध्ये 1 रुग्ण सापडला आहे.