अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवार 13 मार्च रोजी दुपारी 12.20 वा.चाफेरी पाटील वाडा येथील फाट्यावर घडली आहे.

एमडी रकीबबुल इस्लाम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार मिलिंद कदम यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी दुपारी एमडी रकीबबुल आपल्या ताब्यातील दुचाकीवर पाठीमागे एमडी नदीम हसन याला बसवून जयगड ते रत्नागिरी असे भरधाव वेगाने येत होता. तो चाफेरी पाटील वाडा येथील फाट्याजवळ आला असता त्याचा दुचाकीवरील ताबा सूटला. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजुच्या गटारात पडून हा अपघात झाला. यात दोघांनाही दुखापत झालेली असून चालकाविरोधात भादंवि कायदा कलम 279,337,338, मोटार वाहन कायदा 184,129,194 डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.