रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत पाठीमागे बसलेल्या एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी चालकविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 जुलै रोजी सायंकाळी 7 वा. चाफेरी गवळीवाडी रस्त्याच्या अलीकडे घडली होती.
सुलतान मुहम्मद डिंगणकर (55,रा.जांभारी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. या अपघातात मेहराज यासिन डिंगणकर (45,रा.जांभारी, रत्नागिरी ) यांचा मृत्यू झाला होता.27 जुलै रोजी सुलतान आपल्या ताब्यात ऍक्टिवा (एमएच-46-वाय-9969) वरून मेहराज डिंगणकरला सोबत घेऊन जयगड ते खंडाळा असा भरधाव जात होता.तो चाफेरी गवळीवाडी रस्त्याच्या अलीकडे आला असता कुत्रा आडवा आल्याने सुलताने गाडीचा ब्रेक लावला.अचानक ब्रेक लावल्याने गाडी घसरून हा अपघात झाला होता.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर करत आहेत.