देवरुख:- मुंबई – गोवा महामार्गावरील धामणी येथे कंटेनरने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करून हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते. या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायाधीशांनी २० हजार रुपये दंड व तीन महिने सश्रम कारावासची शिक्षा सुनावली आहे.
राजू मोहन दास (रा. गोवा) हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन १२ फेब्रुवारी २०२१ रोजी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. कंटेनर धामणी येथे आला असता पादचारी श्रीराम तुकाराम वनकर यांना कंटेनरची धडक बसली. या अपघातात वनकर यांचा मृत्यू झाला. याबाबतची फीर्याद पोलीस पाटील अनंत पाध्ये यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. यानुसार कंटेनर चालक राजू दास याच्याविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.