रत्नागिरी :- लॉकडाऊन शिथिलतेनंतर अत्यावश्यक सेवेतील वाहन चालक आणि मदतनीस यांना परवानगी देण्यात आली आहे. ही वाहतूक परवानगी देण्यात आलेल्या वाहनांचे चालक आणि मदतनीस यांनी कोरोनाचा फैलाव होवू नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशी परवानगी असणाऱ्यांची ओळख पटणे शक्य व्हावे यासाठी वाहनचालक व मदतनीस यांच्या हातावर अत्यावश्यक वाहतूक असा शिक्का मारणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा व्यक्तींना सामान ज्या ठिकाणी पोहचवायचे त्या ठिकाणाखेरीज इतर कोठेही वावरतायेणार नाही असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.
पावसाळा येत आहे हे लक्षात घेऊन लॉकडाऊन अंतर्गत काही तातडीच्या कामांना परवानगी असेल असे शासनातर्फे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. इमारत देखभाल व दुरुस्ती, वॉटर प्रुफींग, पूर नियंत्रण संदर्भात बांधकाम तसेच धोकादायक इमारती पाडणे यांना डिस्टन्सींग व इतर स्वच्छतेच्या नियमांसह परवानगी देण्यात आली आहे.