रत्नागिरी:- निवडणूक आयोगाच्या आदेशावरून जिल्हा निवडणूक विभागाने रत्नागिरी पालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर केली आहे. एकूण ३२ सदस्यसंख्या असेलल्या या पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखून ठेवण्याच्या जागा निश्चित केल्या आहेत. यामध्ये महिलांसाठी राखून ठेवलेल्या १६ जागा आणि सर्वसाधारण राखून ठेवलेल्या १६ जागांचा समावेश आहे. प्रभाग रचनेनंतर आलेल्या ११ हरकती व आक्षेप यांचा सर्वकष विचार करून अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नगर पालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १०, पोटकलम (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी ही अंतिम प्रभागरचना जाहीर केली. यामध्ये जितक्या प्रभागामध्ये विभागणी झाली आहे त्याची संख्या, प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची २०११च्या जनगननेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा यामध्ये हे ३२ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. प्रभाग १ची लोकसंख्या ४ हजार ९४४ आहे. यामध्ये पालकर हॉस्पिटल, आलीमवाडी, सत्यनारायण मंदिल, डीएसपी बंगला, आंबेडकरवाडी, शहर पोलिस ठाणे, नवलाई मंदिर, गणपती मंदिर, परशुराम विद्यामंदिर हा परिसर येतो.
प्रभाग २ ची लोकसंख्या ४ हजार ७१० आहे. यामध्ये वरचा फगरवठार, जिल्हा उद्योग केंद्र, गवळीवाडा, सन्मित्रनगर, चोळीचा पऱ्या, के. सी. जैन नगर, हॉटेल विहार डिलक्स, देसाई हायस्कूल, शिर्के हायस्कूलचा समावेश आहे. प्रभाग ३ ची लोकसंख्या ४ हजार ४३४ आहे. यामध्ये एकता मार्ग, संसारे उद्यान, कीर कम्पाऊंड, अनंत सागर अपार्टमेंट, गर्व्हमेंट कॉटर्स, मिल्लत नगर, किस्मत बेकरी, चव्हाण कम्पाऊंड, स्टेट बॅंक कॉलनीचा काही भाग. प्रभाग ४ ची लोकसंख्या ४ हजार ४८१ आहे. यामध्ये स्टेट बॅंक कॉलनीचा काही भाग, नगरपालिका कॉलनी, राजन नगर, कोकण नगर म्हाडा वसाहत फेट १,२,३,४, कोकण नगर कब्रस्तान.
प्रभाग ५ मध्ये लोकसंख्या ४ हजार ३६४ आहे. यामध्ये क्रांतीनगर झोपडपट्टी, जलशुद्धीकरण केंद्र, साळवी स्टॉप, छत्रपती नगर काही भाग, रमेश नगर, पार्से स्क्वेअर, जलतरण तलाव, ट्रक टर्मिनल, कलारत्न अपार्टमेंट, गुलमोहर अपार्टमेंट. प्रभाग ६ ची लोकसंख्या ४ हजार ४६६ आहे. यामध्ये हॉटेल व्यंकटेश मारूती मंदिर, पार्से स्क्वेअर, छत्रपती नगर काही भाग, नवलाई नगर, आयटीआय अभ्युदयनगर काही भाग, कर्लेकर कम्पाऊंड, साळगावकर कंपाऊंड. प्रभाग ७ ची लोकसंख्या ४ हजार ४८५ आहे. यामध्ये हिंदू कॉलनी, कर्लेकरवाडी, दामले हायस्कूल, अभ्युदयनगर काही भाग, आयटीआयचा मागील परिसर, सहकार नगर, नवलाई मंदिर परिसर, आंबेशेत, गणेश स्टॉप कर्ला, सुर्वे कम्पाऊंड कर्ला, राजिवडा कब्रस्तान, जिजामात उद्यान, आनंदनगर,
प्रभाग ८ ची लोकसंख्या ५ हजार ०३१ आहे. यामध्ये मेन्टल हॉस्पिटल, गांधी पेट्रोल पंप, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम, हिंदू कॉलनी काही भाग, झापडेकर इमला, आकाशवाणी केंद्र, जिल्हाधिकारी निवास, हॉटेल लॅण्डमार्क, आदमपूर, निवखोल.