हातखंबा येथे दुचाकीला डंपरची धडक; स्वार जखमी

रत्नागिरी:- हातखंबा येथील पेट्रोल पंपासमोरील दुचाकीला डंपरने मागून ठोकर दिली. या अपघातामध्ये स्वार जखमी झाला. अपघात घडल्यानंतर डंपर चालकाने पलायन केले. दुखापतीस कारणीभूत झालेल्या डंपर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डंपर (क्र. एमएच-४६ बीएफ १०४४) वरिल संशयित चालक (नाव पत्ता माहित नाही) ही घटना शनिवारी (ता. ६) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास लकेश्री पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निरज गणपत रेवाळे (वय २५, रा. भोके-रेवाळेवाडी, रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एआर ३०३४) घेऊन घरी जात असताना खेडशीहून हातखंबा पेट्रोल पंप रस्त्यावर आले असता मागून येणाऱ्या डंपर चालकाने ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली. या अपघातात रेवाळे जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व पायाला, हाताला दुखापत झाली. मात्र संशयित चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. या प्रकरणी निरज रेवाळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत