स्वप्नाली सावंत खुन प्रकरणाचा दुसरा अध्याय सुरू
रत्नागिरी:- स्वप्नाली सावंत खुन प्रकरणाच्या चौकशीचा दुसरा अध्यास सुरू झाला आहे. मुख्य संशयित आरोपींना अटक केल्यानंतर सुकांत उर्फ भाई सावंत यांच्या मोबाईलचा सीडीआर मागवून त्यांच्या संपर्कात असलेल्या सर्वांची चौकशी सुरू झाली आहे. नुकतीच काही राजकीय नेत्यांची डीवायएसपी कार्यालयाकडुन चौकशी झाली. त्यामुळे खुनाच्या दरम्याने भाईंच्या संपर्कात असणाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणाच्या डीएनए चाचणीचा अहवाल येण्यास अजून महिना ते दीड महिना जाणार असल्याची माहिती संबंधित पोलिस यंत्रणेने वर्तविली. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी स्वप्नाली सावंत खुन प्रकरणाचा सर्व बाजूनी तपास करण्याचे आदेश संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार ही चौकशी सुरू झाली आहे.
स्वप्नाली सुकांत सावंत या बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पती सुकांत गजानन सावंत यांनी २ सप्टेंबरला दिली होती. सावंत पती – पत्नी मध्ये खूप वर्षांपासून कौटुंबिक वाद होता. या बाबत पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात तक्रारी देखील दाखल आहेत . स्वप्नील सावंत हिच्या बद्दल यापूर्वीही बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या होत्या. पती-पत्नीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वप्नालीचा घातपात झाला असावा, अशी तक्रार स्वप्नाली सावंत हिची आई सौ . संगिता कृष्णा शिर्के यांनी यांनी ११ सप्टेंबरला यांनी दिली. त्यामध्ये स्वप्नालीचा पती सुकांत गजानन सावंत , रुपेश ऊर्फ छोटा भाई सावंत व पम्या ऊर्फ प्रमोद गावणंग या तिघांनी मिळून स्वप्नालीला ठार मारल्याचे सुकांत सांवत याने स्वतः आपल्याला सांगितल्याची लेखी तक्रार त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला दिशा देत ७ तपासपथके तयार केली. वर्षभर खुनाचा कट रचून सर्व पुरावे नष्ट करण्याचे नियोजन केले होते. त्याप्रमाणे सर्व घडत गेले. मात्र एक चुक त्यांना महागात पडली आणि त्यांचा कट उघड झाला. पोलिसांना मृतदेह जाळलेल्या ठिकाणी ६ ते ८ मानवी हाडे सापडली आहेत. तर बाजूलाच कुजलेल्या अवस्थेत मांस आणि दात मिळाला आहे. यावरून तिथे खुन झाल्याचे निष्पन्न झाले. संशयितांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर खुनाची कबुली दिली. दात डीएनएसाठी पाठविण्यात आला आहे. तो मॅच होणार असल्याचा विश्वास पोलिस दलाला आहे. तसे झाले तर भाई सावंत यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
काही दिवसांपूर्वी भाई सावंत यांच्या संपर्कात असलेल्या एका वकीलाने अटकपूर्व जामीन घेतला आहे. आता भाई सावंत यांच्या माबाईलच्या सीडीआरवरून प्रत्येकाल चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. कामामिनित्त भाई सावंत यांना फोन केलेल्या काही राजकीय नेत्यांची नुकतीच चौकशी झाली. अशी अनेकांची चौकशी होणार आहे, असून त्याचा खुनाशी काही संबंध आहे का, याची शहानिशा सुरू झाली आहे. ही केस भक्कम करण्याच्यादृष्टीने पोलिसांचे जोरदार प्रयत्न असून यामुळे अनेकांची भंबेरी उडाली आहे.