रत्नागिरी:- शहरानजीकच्या फिनोलेक्स कॉलनीच्या मागील बाजूस कातळावर मद्य प्राशन करणाऱ्या दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील नंदकिशोर गोडवे (रा. जुनी तांबटआळी, रत्नागिरी) व सर्वेश संजय सावंतदेसाई (रा. गणपती अपार्टमेंट, साळवीस्टॉप, रत्नागिरी) असे संशयितांची नावे आहे. या घटना शनिवारी (ता. २१) सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिनोलेक्स कॉलनीच्या मागील बाजूस सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत होते. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल विनायक राजवैद्य व सहाय्यक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.