संगमेश्वर:- पाटगाव (ता. संगमेश्वर) येथे रस्ता ओलांडणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने प्रौढाला धडक दिली. गंभीर जखमी प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दीपक सुरेश नटे (वय ४२, रा. पाटगाव-नटेवाडी, ता. संगमेश्वर ) असे जखमी प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २०) पाटगाव एसटी स्टॉप येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालक दीपक नटे हे पाटगाव येथे रस्ता ओलांडत असताना अचानक वेगाने येणाऱ्या अज्ञात स्वाराने धडक दिली. यामध्ये नटे यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने नातेवाईकांनी रिक्षाने देवरूख ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या पोलिसचौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.