‘श्वान रॅम्बो’ने लावला अवघ्या काही मिनिटांत चोरीचा छडा

रत्नागिरी:- रत्नागिरी पोलीस दलातील श्वान रॅम्बो याने अवघ्या काही मिनिटात चोरीचा छडा लावला आहे. संगमेश्वर तालुक्यातील चोरी प्रकरणात श्वान रॅम्बोला पाचारण करण्यात आले होते. रॅम्बोने दिलेल्या इशाऱ्या नुसार पोलिसांनी संशयित आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले. 

संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्या मधील अज्ञात चोरट्याचा सुगावा लावण्याकरिता रत्नागिरी पोलीस श्वान पथकातील श्वान रॅम्बो यास पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तूंचा गंध त्याच्या हँडलेटद्वारे देण्यात आला. हा गंध घेताच श्वान रॅम्बोने घराच्या मागील दरवाजाने बाहेर पडून 360 मिटरच्या अंतरापर्यंत माघ काढून इशारा दिला.

ही संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. प्रवीण देशमुख यांनी या श्वान व तपास पथकास जवळच झालेल्या अन्य एका चोरीच्या गुन्ह्याची माहिती दिली व घटनास्थळी लागलीच जाण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे घटनास्थळी हे पथक पोहचले व श्वान रॅम्बो यास घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तूंचा त्याच्या हँडलरद्वारे, गंध देण्यात आला.

हा गंध घेताच श्वान रॅम्बोने घराच्या मुख्य दरवाजाने बाहेर पडून व आंगणाद्वारे गुटांच्या गोठ्या जवळील पायवाटेने 35 मिटर अंतरावर राहत असणाऱ्या श्री. सुभाष सोमा ओकटे यांच्या घरात जाऊन श्वान हस्तकांना इशारा दिला. श्री. सुभाष सोमा ओकटे यांच्यावर संगमेश्वर पोलीसांचा पूर्वीपासून संशय होताच व श्वान रॅम्बोने यावर शिक्कामोर्तब केला. यावरून संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नं. 13/2023 भा.द.वि.सं कलम 454,380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी सुभाष सोमा ओकटे यास ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात चोरीस गेला मुद्देमाल 60,000 रोख हस्तगत करण्यात आला आहे.