शेजाऱ्यांकडे बसायला गेले इकडे चोरट्याने साधला डाव; फ्लॅटमधील तीन मोबाईलची चोरी

खेड:- फ्लॅटला कडी लावून शेजाऱ्यांकडे बसायला गेलेल्या महिलेचा फ्लॅट फोडल्याची घटना खेड मधील शिवाजीनगर येथे घडली. याबाबतची फिर्याद शहेबाज सलीम खोत ( २७, रा. जुनेद अपार्टमेंट १०१, पहिला मजला, शिव राजीनगर, महाराष्ट्र बेकरीजवळ, खेड ) यांनी खेड पोलीस स्थानकात दिली . ही घटना ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वा . च्या सुमारास घडली.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शहेबाज खोत हे आपल्या आई आणि मावशीसोबत फ्लॅटला कडी लावून शेजाऱ्यांकडे १०२ नंबरच्या जहीरा जलील नाडकर यांच्या घरी गप्पा मारत बसले होते . सायंकाळी ५ वा . च्या दरम्याने शहेबाज खोत आणि आई . मावशी आपल्या फ्लॅटमध्ये गेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला . त्यांच्या फ्लॅटची कडी उघडून अज्ञाताने ३५ हजार ५०० रुपयांचे ३ मोबाईल चोरुन नेल्याचे लक्षात आले . खोत यांनी पोलीस स्थानकात दाखल केलेल्या फिर्यादीनुस र अज्ञातावर भादविकलम ४५४ , ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .