रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर येथील वेश्या व्यवसाय प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र चव्हाणच्या अन्य दोन साथिदारांच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांनी यश आले आहे. हे त्रिकूट अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे वेश्याव्यवसाय चालवत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.या तिघांनाही न्यायालयाने 27 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
अब्दुल मतीन हसनमियाँ डोंगरकर (36,रा.बोर्डिंग रोड माळनाका,रत्नागिरी) आणि ओमकार जगदीश बोरकर (चिंचखरी,रत्नागिरी) अशी अन्य दोन संशयितांची नावे आहेत.शहरातील मध्यवर्ती आणि उच्चभ्रू ठिकाणी-सिध्दिविनायक नगर येथील ट्युलिप बिल्डिंगमधील ए विंगमधल्या एका फॅल्टमध्ये दोन तरुणींचा वापर करुन राजेंद्र चव्हाण वेश्याव्यवसाय चालवत होता. त्याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवार 20 जुलै रोजी दुपारी 2.20 वा. अटक केली होती. पोलिस कोठडीत त्याची कसून चौकशी केल्यावर त्याच्या मोबाईल क्रमांकाच्या सीडीआर वरुन त्याच्या या दोन साथिदारांचाही या गुन्ह्यात सहभाग निश्चित करण्यात आला.हे तिघेही या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाल्यावर मंगळवार 25 जुलै रोजी शहर पोलिसांनी या दोन्ही संशयितांना अटक केली.दरम्यान,राजेंद्र चव्हाणच्या 1 दिवस वाढ करण्यात आलेल्या पोलिस कोठडीचीही मुदत मंगळवारी संपल्याने या तिन्ही संशयित आरोपींना एकत्रित न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी 27 ज्ाुलैपर्यंत पोलिस कोठडीत केली.याप्रकरणी शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.