शहरात गांजा ओढणाऱ्या तिघांना न्यायालयाकडून शिक्षा 

रत्नागिरी:- शहरातील विविध भागांमध्ये गांजा ओढताना रंगेहात पकडलेल्या तिघांना येथील न्यायालयाने प्रत्येकी ५ हजार रु.दंडाची शिक्षा ठोठावली.शहर पोलीस निरिक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.त्यावरील सुनावनी दरम्यान न्यायालयाने आपला निर्णय देत दंडाची शिक्षा केली.

शहरातील मुख्य टपाल कार्यालयाच्या मार्गावर दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोहम्मद ताहीर इब्रहिम मस्तान (वय.३२, रा. मिरकरवाडा) हा गांजा ओढत असताना हे.कॉ. दिपराज पाटील यांनी रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शहरातील बीएसएनल कार्यालयासमोरील मार्गावर बांधाच्या अडोशाला उभे राहून नुमान मुनीर दर्वे (वय.२५.रा.एकतामार्ग, मारुती मंदिर याला दिपराज पाटील यांनीच गांजा ओढताना रंगेहात पकडले होते. त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिरकरवाडा येथील जेटीवर दि. १६ ऑक्टोबर रोजी शयबाज मुबारक हकीम(वय २२, रा.जुनी बाजारपेठ लांजा) या गांजा ओढत असताना हे .कॉ. पाटील यांनी रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्याच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला होता.

तिघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यावर सुनावनी दरम्यान न्यायालयाने तिघांना प्रत्येकी ५ हजार रु.दंडाची शिक्षा ठोठावली. पोलीस निरिक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनााखाली हे.कॉ..मंदार मोहिते, दिपराज पाटील यांनी हि कामगिरी केली होती. दोघांचेही पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक सौ.जयश्री गायकवाड यांनी अभिनंद केले आहे.