रत्नागिरी:- रेल्वे प्रशासनातर्फे गणेशभक्तांसाठी ३१ जुलैला आणखी पाच विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली होती. या गाड्या रत्नागिरी स्थानकापर्यंत धावणार आहेत. या गाड्यांसाठी आरक्षण प्रक्रिया ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
एलटीटी-रत्नागिरी-एलटीटी द्विसाप्ताहिक (०१०३१/०१०३२), पुणे-रत्नागिरी-पुणे साप्ताहिक (०१४४७/०१४४८), रत्नागिरी-पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक (०१४४४/०१४४३), पुणे-रत्नागिरी-पुणे साप्ताहिक (०१४४५/०१४४६), रत्नागिरी-पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक (०१४४२/०१४४१) या पाच गाड्यांची घोषणा झाली. यांतील रत्नागिरी-एलटीटी (०१०३२), रत्नागिरी-पुणे (०१४४८), रत्नागिरी-पनवेल (०१४४४), रत्नागिरी-पुणे (०१४४६), रत्नागिरी-पनवेल (०१४४६) या गाड्यांसाठी आरक्षण प्रक्रिया ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टिम, इंटरनेट आणि आयआरसीटीसी संकेस्थळाच्या माध्यमातून सुरू होणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.